‘त्या’ ट्वीटबाबत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई (वृत्तसंस्था) शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमधील चुकीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ६ मे रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक ‘कार्यकर्ते’ असा केला होता. या आक्षेपार्ह उल्लेखामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस टीका होत होती.

 

Protected Content