मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान करून राज्यात खळबळ उडवून दिले आहे. दरम्यान या संदर्भात सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते आकाशवाणी चौक दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलनात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लादवंजारी , महिला महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटिल , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल , प्रवक्ते योगेश देसले , युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी , उमेश नेमाडे , सुनील माळी , अमोल कोल्हे , किरण राजपूत , सुशील शिंदे , अरविंद मानकरी , नईम खाटिक , प्रतिभा शिरसाठ , शालिनी सोनवणे , संजय जाधव , सलीम ईनामदार , जितेंद्र बागरे , राहुल टोके, हितेश जावळे , अनिल पवार , ललित नारखेडे , दत्तात्रय सोनवणे , रमेश बहारे , अशोक सोनवणे, कुंदन सूर्यवंशी, रफिक पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content