Theft : महिलेच्या घरातून ५० हजाराची रोकड लांबविली

पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंद घरात प्रवेश करून ५० हजाराची रोकड व कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे राहणाऱ्या सुनिता सुरेश गायकवाड (वय-४५) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ एप्रिल रात्री ८.३० ते २६ एप्रिल सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या गावातील गणेश उत्तम जाधव याने घरात कुणीही नसतांना प्रवेश करून घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि इतर कागदपत्रे चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनिता गायकवाड यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी गणेश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे करीत आहे.

Protected Content