बोंबला : कोरोनानंतर आता ‘या’ व्याधीने वाढविले टेन्शन

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | अजून कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसतांनाच नव्या रोगाने धास्ती वाढविली असून विशेष म्हणजे याचा संसर्ग चीनमध्येच आढळून आलेला आहे.

चीनमध्ये बर्ड फ्लूच्या ‘एच३एन८’ स्ट्रेनच्या पहिला मानवी रुग्ण सापडला आहे. चार वर्षांच्या मुलाला याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ‘एच३एन८’ या रोगाचा संसर्ग पहिल्यांदा २००२ मध्ये उत्तर अमेरिकेत विषाणू आढळून आला होता. यानंतर घोडे, कुत्रे आणि सील यांना संसर्ग झाला, परंतु या संसर्गाचा प्रभाव मानवांमध्ये दिसला नाही.

आता मात्र या व्याधीचा मानवात संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. चीनच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य हेनान प्रांतात राहणार्‍या एका ४ वर्षांच्या मुलामध्ये ताप आणि इतर लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या मुलाच्या या महिन्याच्या सुरुवातीला चाचण्या केल्या. ज्यामध्ये हा एच३एन८ या विषाणूने पॉझिटिव्ह आढळला. नॅशनल हेल्थ आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मुलाच्या कुटुंबाने घरी कोंबडी पाळली होती आणि हे कुटुंब जंगली बदकांचे वास्तव्य असणार्‍या भागात राहत होते.

या मुलाला थेट पक्ष्यांकडून संसर्ग झाल्याचे नॅशनल हेल्थ आयोगाने म्हटले आहे

Protected Content