नवाब मलिकांना दिलासा नाही: सोमवारी पु्न्हा सुनावणी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  ईडीने लावलेले गुन्हे मागे घ्यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. पण, कोर्टाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण त्यांना झालेली अटक ही बेकायदा असल्याचं सांगत याविरोधात मुंबई हायकोर्टात  याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली, पण मलिकांना आज दिलासा मिळाला नाही.

मलिकांच्यावतीनं हायकोर्टात युक्तीवाद करताना अमित देसाई म्हणाले, मलिक यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदा आहे. सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण आहे. मलिकांच्या रिमांडमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचा उल्लेख होता. यामध्ये दोन व्यवहार दाखवले आहेत. यातील पहिल्या व्यवहारात मलिकांचा सहभाग नाही. सन 2003-05 मध्ये दुसरा व्यवहार झाला. सन 2003 मध्ये जेव्हा मलिकांच्या कुटुंबानं सॉलिडस ही कंपनी विकत घेतली ज्या जागेवर भाडेकरू होते. त्यानंतर 2005 मध्ये मलिकांनी भाडेकरू राहत असलेली जमीन विकत घेतली. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ७ मार्च रोजी यावर पुढील सुनावणी होईल.

 

 

Protected Content