जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार : सर्व उमेदवारांचे अर्ज मागे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल गठित व्हावे, यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला असून यात जिल्ह्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ लावले पण यातून काहीही सिद्ध झाले नाही. यानंतर महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाड झाल्याचे चित्र होते. काल संध्याकाळपर्यंत नेमके काय होणार याबाबतचे चित्र स्पष्ट होते. या पार्श्‍वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि या माध्यमातून निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये महा विकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Protected Content