राकेश फेगडे यांच्या पाठपुराव्याने हरभरा खरेदीसाठी नोंदणी साठी मुदतवाढ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने हरभरा खरेदीला मुदतवाढ मिळाली आहे.

 

तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व उप अभिकर्ता संस्था म्हणुन कार्य करीत असलेल्या कोरपावली तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेऊरमन राकेश वसंत फेगडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असुन २०२२-२०२३ वर्षाच्या रब्बी हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत  नाफेड चे हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळाली आहे.

 

यासाठी कोरपावली येथील केंद्र उपअभिकर्ता संस्था म्हणून कार्यरत असलेल्या तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार १ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आज पर्यंत ७७५ शेतकर्‍यांची नोदणी झालेली आहे आता नवीन पत्राअन्वये ३१ मार्च २०२३ पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शेतकर्‍यांनी नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स,  हरभरा पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला  ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा.

शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते .

हमीभाव ५३३५ छ उत्पादकता :- १३५० किलो हेक्टरी असे असल्याची माहीती राकेश वसंत फेगडे (चेअरमन वि.का.सोसायटी.कोरपावली ) यांनी दिली असुन , शेतकर्‍यांनी या मुद्दतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Protected Content