‘त्या’ पाच नगरसेवकांवरील कारवाईबाबत मनपा आयुक्तांनी दाखवली असमर्थता

jalgaon 1

जळगाव, प्रतिनिधी | घरकुल घोटाळाप्रकरणी मनपातील विद्यमान पाचही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यास मनपा आयुक्तांनी असमर्थता दर्शविली आहे. या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांचे पद रद्द करावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

धुळे विशेष न्यायालयाने घरकुल घोटाळ्यातील आजी माजी दोषी नगरसेवकांना शिक्षा सुनवली आहे. या दोषी नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती. यानुसार या ५ नगरसेवकांची आयुक्तांनी वेळोवेळी सुनावणी घेतली. अशी सुनावणी घेण्याचा अधिकार आयुक्तांना नसल्याचा विद्यमान नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला होता. याची दखल घेत शुक्रवारी (दि.१०) आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सदर नगरसेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकार क्षेत्र व अधिकार अभावी अनर्ह (अपात्र ) करण्यात येत नसल्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने आयुक्त डॉ. टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृतास दुजोरा दिला आहे.

या विद्यमान नगरसेवकांचा घरकुल घोटाळा दोषीमध्ये आहे नाव
नगरसेवक सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, दत्तात्रय कोळी, कैलास सोनवणे,

Protected Content