जैन समूहातर्फे कोरोनाविषयक जनजागृतीपर पुस्तिकांचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी येथील जैन उद्योग समूहातर्फे एक लाख पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

 

कोरोनावर मात करण्यासाठी व नागरिकांना सजग करण्यासाठी जैन इरिगेशनतर्फे एक लाख माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. या पुस्तिकांच्या वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत भाग १ ते ८ सह १६ या प्रभागात ३६ हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. या पुस्तिकांत सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या माहितीचा समावेश आहे. या पुस्तिका प्रत्येक घरोघरी व्यक्तिगत पातळीवर पोहोचवण्यात येत आहे.

कोविड- १९ या नावाची ही माहिती पुस्तिका छापताना व वितरण करताना सॅनिटायझरचा उपयोग करून जंतूनाशकांची फवारणी करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेमध्ये कोरोना विषाणू-सर्वसाधारण माहिती, कोरोना विषाणू-आजाराची लक्षणे, हा आजार पसरतो कसा? आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, वैद्यकीय सल्ला ताबडतोब कोणी घेतला पाहिजे? नवीन कोरोना विषाणू उपाययोजना, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन, सर्वसामान्य मनात उद्भवणारी प्रश्‍न आणि त्याचे निरसन, काय करावे व काय करू नये? राष्ट्रीय – राज्यस्तरीय व स्थानिक संपर्कासंदर्भातील संपूर्ण माहिती या पुस्तिकेत दिली आहे. या आजारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिव्हिल) ०२५७- २२२६६४२(१३२) कोरोना कक्ष यावर संपर्क साधावा, आदी माहिती नागरिकांना मार्गदर्शनासाठी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content