रेल्वे पोलिसाला करोनाची लागण; उपचार सुरू

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यरत असणार्‍या रेल्वे पोलिस कर्मचार्‍याला करोनाची लागण झाली असून त्यांच्यासह पत्नीसह दोन मुलांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ५१ वर्षीय रेल्वे पोलिस कर्मचार्‍याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रेल्वे कर्मचार्‍याच्या पत्नीसह दोन मुलांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करोनाबाधित कर्मचारी कल्याण, खडकपाडा येथे राहत असून ते सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात नियुक्त होते. गेले काही दिवस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझटीव्ह आला. यामुळे या कर्मचार्‍याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पोलिसाच्या संपर्कात आलेल्या एकूण १५ रेल्वे पोलिसांनादेखील करोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content