खडकी येथील अपघातात एकाच मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । कामाचे पैसे घेऊन खडकी गावातून चाळीसगाव येथे येत असताना एच.पी. पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हिरालाल परदेशी (वय- ३५ रा. खडकी ता. चाळीसगाव) कामाचे पैसे घेऊन खडकीहून दुचाकीने ( गाडी. क्र. एम.एच. १९ बी.एन.२०६२) चाळीसगावाकडे येत असताना खडकी जवळील एच.पी. पेट्रोल पंपासमोर समोरील भरधाव दुचाकीचे (गाडी क्र. एम. एच. १५ बी. के. ५५७८) वेगावर आवर न घातल्याने सकाळी ९ वाजेच्या सुमारास अपघात घडला. त्यात रणजित परदेशी यांना डोक्याला जबर दुखापत झाली.  त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. सदर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा नाव गाव पत्ता स्पष्ट झालेला नसून शोध सुरू आहे. राजू मनोहर परदेशी यांनी फिर्याद दाखल करत होते. रणजित परदेशी यांच्या पाश्चात्य आई, पत्नी व दोन मुले आहेत. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना.२२३७ मुकेश पाटील हे करणार आहे.

Protected Content