जे . टी. महाजन सहकारी सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

यावल प्रतिनिधी- येथील जे.टी. महाजन सूत गिरणीवर आज मालमत्ता कर थकबाकीमुळे नगरपालिका प्रशासनाने जप्तीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीकोणातुन जेष्ठ दिवगंत नेते जिवराम तुकाराम महाजन यांनी सुतगिरणीच्या रूपाने प्रकल्पची उभारणी केली होती. त्याच प्रकल्पवर आज यावल नगर परिषदने मागील दहा वर्षापासुन कर न भरल्याने आज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे .

दरम्यान नगरपरिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्या आदेशाने आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नगर परिषदचे सहाय्यक कर निरिक्षक निकेतन प्रभाकर बयाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक राजेन्द्र चिंतामण गायकवाड , अनिल हरचंद चौधरी , रवीन्द्र रघुनाथ बारी , मधुकर राजाराम गजरे, संतोष किसन नन्नवरे , असदुउल्ला खान इबादुल्ला खान आणी रफीक अहमद सईद अहमद अरब यांच्या पथकाने ही जे .टी . महाजन सुतगिरणीची कडील मागील सन् २०१२पासुनचे गट क्रमांक२१३१ , २०३२ आणी २०३० या गटातील मालमत्तेचे कर१ कोटी८४ लाख१२ हजार९६४ रुपयांची करापोटीची थकबाकी रक्कम मागील १० वर्षापासुन न भरल्याने जे .टी . महाजन सुतगिरणी प्रकल्पच्या मालमत्ताची जप्ती करण्यात आली आहे.

दरम्यान यावल नगरपरिषद व्दारे यावल तालुक्यातील एकेकाळी वैभव समजल्या जाणाऱ्या शेतकरी हिताचा मधुकर सहकारी साखर कारखाना व आता ही सुतगिरणी या मोठया प्रकल्पावर मालमत्ता जप्तीची वेळ आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्राची अद्योगतीकडे वाटचाल झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड असा नाराजीचा सुर निघत आहे . नगर परिषदच्या या धडक वसुली मोहीमेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे असा प्रकारे मोठया मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर परिषदच्या सुत्रांनी दिलेल्या माहीती व्दारे सांगीतले आहे.

 

 

 

 

 

 

 

Protected Content