आयएनएक्स प्रकरणः सीबीआयकडून कोर्टात आरोपपत्र दाखल

chidambaram

दिल्ली प्रतिनिधी । आयएनएक्‍स मीडिया आर्थिक घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास विभागाने (सीबीआय) आज दिल्लीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्र माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह 14 जणांच्या नावाचा समावेश असून यावर, येत्या सोमवारी (दि.21) सुनावणी होणार आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावाचा यात समावेश आहे. यांपैकी पी. चिदंबरम याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. गुरुवारी कोर्टाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती. २१ ऑगस्ट रोजी त्यांना अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिने ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांची देखील या आरोपपत्रात नावे आहेत. माजी पती-पत्नी असलेले हे दोघे सध्या मुंबईच्या ऑर्थरोड आणि भायखाळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हायप्रोफाईल हत्याकांड प्रकरणात सीबीआय कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडियाची संचालक होती. त्यामुळे दोघांवर या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाला मंजूरी दिल्याचा आरोप आहे.

Protected Content