वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर पकडले; तीन जणांवर गुन्हा दाखल

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील आमडदे गावातील रस्त्यावरून डंपरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करतांना महसूल पथकाने पकडले आहे. याप्रकरणाी तीन जणांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील वाळू वाहतूक करण्यास पुर्णपणे बंदी आहे. असे असतांना भडगाव तालुक्यातील आमडदे गावातील रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक डंपरमधून होत असल्याची गोपनिय माहिती भडगाव महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार महसूल पथकाने शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मंडळाधिकारी दिशेन येडे यांनी आपल्या पथकासह सापळा रचला. त्यावेळी विनाक्रमांकाचे डंपर आडविले. त्यात वाळू दिसून आले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता डंपर चालकाने उडवाची उत्तरे दिली. दरम्यान पथकाने वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहे. प्रकरणी मंडळाधिकारी दिनेश येडे यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर रविंद्र हाडिंगे रा. शिवाजी नगर, भडगाव, प्रविण संजय पाटील आणि लक्ष्मण पाटील (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) या तीन जणांविरोधा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Protected Content