Home क्राईम वावडदा रोडवरील नाल्याजवळून दुचाकी लांबविली

वावडदा रोडवरील नाल्याजवळून दुचाकी लांबविली

0
40


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते वावदडा रोडवरील कुरकुर नाल्यानजीक एका विहीरीजवळून २५ हजार रुपयांची दुचाकी लांबविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसावद येथील रहिवासी विजय ज्ञानेश्वर पाटील वय ३२ हे वेगा कंपनीत नोकरीला आहे. १० ऑगस्ट रोजी ते वावदडा रोडवर कुरकुर नाला परिसरात आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ सीसी ७४९४) या क्रमाकांची दुचाकी नाल्याजवळ असलेल्या एका विहिरीनजीक उभी केली. काम आटोपून परतल्यावर दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने सहा दिवसानंतर विजय पाटील यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound