यावल महाविद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर स्पर्धा उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रमाच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन नुकतेच प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत 21 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात अनुक्रमे प्राची मच्छिंद्र पाटील (एफ वाय बी ए)- प्रथम, वैष्णवी प्रकाश माळी (एफ वाय बी कॉम) -द्वितीय, मयुरी लीलाधर धर्माधिकारी (एफ वाय बी कॉम)- तृतीय हे यशाचे मानकरी ठरले. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे यांनी काम पाहिले.

पोस्टर्स स्पर्धेत 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात अनुक्रमे सय्यद अनीष अन्वर (एफ वाय बी ए)- प्रथम, निळे प्रीती दिलीप (एस वाय बी एस्सी) – द्वितीय तर मोरे लक्ष्मी गोविंदा ( एफ वाय बी ए ) – तृतीय यांनी यश संपादन केले. परीक्षक म्हणून प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार यांनी काम पाहिले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुधा खराटे, डॉ.आर. डी. पवार, डॉ. एच. जी. भंगाळे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content