यावल प्रतिनिधी । वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या गावर्यांनी ट्रॅक्टरला जाळून रास्ता रोको केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी तालुक्यातील चिंचोली जवळ आडगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने आज सकाळी एका दुचाकीला धडक दिली. यात दोन विद्यार्थी जागेवरच ठार झाले आहेत. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टर जाळून टाकले असून रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले असून रहदारीदेखील ठप्प झाली आहे.