ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता करा : मुस्लीम बांधवांची मागणी

यावल, प्रतिनिधी | येथील शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील परिसरात मुस्लीम बांधवांच्या पवित्र ईद ए मिलाद सणा निमित्ता सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी मुस्लीम तरूणांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना करण्यात आली आहे.

 

यावल शहरात मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पवित्र सण इदे मिलाद सण आहे. यानिमित्ताने मुस्लीम बहुसंख्य परिसरातील आयेशा नगर वार्ड क्रमांक ३ मध्ये वार्षिक प्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. या परिसरातील रस्ते आदी गटारीच्या कामामुळे व नंतर जलवाहीनीची पाईप लाईन टाकल्याने रस्ते खोदकामामुळे मार्गांची अत्यंत दुराअवस्था झाली आहे. पाऊसाच्या पाण्यामुळे या मार्गाच्या रस्त्यावर विखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या सदस्यांनी देखील या रस्त्यांविषयी चर्चा केली होती. आज दि. १८ रोजी यावल नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता योगेश मदने यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनावर हबीब शेख मंजर , माजी उपनगराध्यक्ष हाजी इकबाल खान , समाजसेवक हाजी गफफार शाह, अस्लम खान , शेख कलिम,अशफाक शाह ,बशिर खान ,सईद शेख,मोहसिन खान,अकील शेख व सर्व मुस्लीम समाजाचे युवकांच्या या निवेदनावर स्वाक्षरी असुन , निवेदना प्रसंगी हे यावेळी उपस्थित होते

Protected Content