आदिवासी वस्तीवरील जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या दांड्या; पालकांच्या तक्रारी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतीदुर्गम भागातील पाडा वस्तीवरील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा कधी बंद तर कधी सुरू राहतात तर मुख्यध्यापक व शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी जात नसल्यामुळे आदिवासी पाड्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा बट्टट्याबोळ होत असल्याची तक्रारी अनेक आदीवासी पालकांकडून करण्यात येत आहे.  जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाने याकडे लक्ष वेधुन दांडया मारणाऱ्या शिक्षका विरूद्ध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील पाडे व वस्तीवर राहणारे आदिवासी समाज हा आपल्या शिक्षणा पासून कुणीही वंचित राहु नये म्हणून मागासलेल्या दारिद्रयरेषे खालील कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र असे असतांना यावल तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील शाळा संदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक वर्गाच्या मनमानी कारभारा मुळेअनेक मुल शिक्षणा पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सातपुडा पर्वतातील क्षेत्रात आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा आहेत. विद्यार्थी आहे मात्र शिक्षकांचा मनमानी कारभारामुळे शाळा असून ही नसल्यासारखे आहेत.

तालुक्यात अनेक शिक्षक हे आपल्या नियुक्तीच्या ठीकाणी शाळांवर जात नसल्याच्या तक्रारी असुन, या आदीवासी पाडयांवर नियुक्त असलेले शिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीचा आवार कीवा तहसिल कार्यलयात फीरताना दिसून येतात. याबाबत माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधले असता आम्हाला या बाबत ची कुठली ही कल्पना नसल्याचे सांगुन चौकशी करुन सांगतो असे उत्तर देऊन सावरा सावर करीत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागातील केन्द्र प्रमुखांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शिक्षक हे शाळांवर हजर राहात नसल्याबाबत च्या आदिवासी बांधवांच्या तक्रारी असुन या गोंधळल्या कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदीवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला असुन  तरी या सर्व कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात येत आहे .

Protected Content