वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचं कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुक्ताईनगर येथे आढावा बैठक घेतली. त्यात दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदी अत्यावश्यक बाबीसाठी कर्ज काढण्याची वेळ आल्यामुळं कर्मचाऱ्यांना वसुली अथवा वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीत “महाराष्ट्र विज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीचे आर्थिक स्थितीवर कर्जाचा वाढता डोंगर परिणामकारक ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदी अत्यावश्यक बाबीसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनी वेगानं काम करत आहेत.

आज शुक्रवार,रोजी जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गुप्ता यांचेसमक्ष मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव उपविभागातील जनमित्र ते अभियंता कर्मचारी, अधिकारी यांना तातडीने बोलावून बैठक घेतली. कंपनी आणि आर्थिक वास्तविकता किती कठीण काळाचा सामना करीत आहे. कंपनी किती मोठ्या प्रमाणात तोटा सहन करून ग्राहकांना सेवा देत असूनही मुक्ताईनगर विभागाची एकूण थकबाकी ३४२.५६ कोटी असणं खूप चिंताजनक असल्याचे मुख्य अभियंता श्री हुमणे यांनी सांगितलं. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वसुली अथवा वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन पर्याय खंडीत करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थकबाकी कोटींमध्ये खालीलप्रमाणे आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

क्षेत्र

घरगुती – २.६१
व्यवसायिक – ०.२४
औद्योगिक – ०.४२
कृषी – ३०६.०९
पथदिवे – १७.९८
पाणीपुरवठा – १५.०१
इतर – ०.१९

एकूण ३४२.५६

सदर बैठकीत कोथळी येथील जागरूक ग्राहक पंकज चौधरी यांनी ‘कृषी पंप वीज धोरण २०२१’ या योजनेचा लाभ घेत १ लाख ७ हजार रुपयांचा भरणा केला आणि ते थकबाकीमुक्त झाले. जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केलं. सर्व कृषी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

Protected Content