Home Cities जळगाव जैन श्रावक संघातर्फे उद्या गुणगौरव कार्यक्रम

जैन श्रावक संघातर्फे उद्या गुणगौरव कार्यक्रम

0
101

जळगाव प्रतिनिधी । येथील जैन युवा फौंडेशनतर्फे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या सहकार्याने रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गणपती नगरातील बाफना स्वाध्याय भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थांचा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दलीचंद जैन, उपाध्यक्ष नैनसुख लुंकड, सामाजिक कार्यकर्ते रतनलाल बाफना, कस्तुरचंद बाफना, ताराबाई डाकलिया, प्रकाशचंद समदडीया, विजया मल्हारा, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रीती अग्रवाल, प्राचार्या देवानंदा साखला आदी मान्यवर उपस्थित राहतील. सत्कारार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी, समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष दर्शन टाटीया व सचिव रितेश छोरीया यांनी केले आहे.


Protected Content

Play sound