हिंगोणा येथील उर्दू शाळेच्या इमारतीला संरक्षण भिंत मंजुर

hingona zp school

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेला संरक्षण भिंत मंजूर करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सरपंच महेश राणे यांनी दिली.

याबाबत वृत्त असे की, हिंगोणा येथील उर्दू शाळेत नुकताच गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश राणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख मुखतार समिती सदस्य हारुन भाई उपस्थीत होते. याप्रसंगी नव्याने रुजु झालेले ग्रेडेड मुख्याध्यापक अहमद खान यांचे देखील स्वागत सत्कार अली मोहंमद जनाब यानी केला. व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा सत्कार पदविधर शिक्षक फारुकी जावेद यानी केले. अन्य मान्यवरांचे स्वागत सत्कार फारुकी सलाहुद्दिन यानी केले.

शाळेच्या सुमारे १०० च्यावर विद्यार्थी व विद्यार्थ्यांना या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरित करण्यात आली. यावेळीे पदविधर शिक्षक सैय्यद मुखतार यांची देखील उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या माध्यमातुन गेल्या अनेक दिवसापासुन अगदी गावाच्या मुख्य मार्गावर असलेल्या या उर्दू शाळाला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे धोके निर्माण झाले असल्याने, तरी या शाळेला संरक्षण भिंत बांधुन मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर या शाळेच्या संरक्षण भिंतीच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे सरपंच महेश राणे यांनी असे जाहीर आश्‍वासन उपास्थितांना दिले यावेळी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी टाळ्या वाजवुन त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदविधर शिक्षक हाजी युसुफ यानी केले,

Protected Content