फायनान्स कंपन्याकडून होणारी सक्तीची वसुली थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विविध फायनान्स कंपन्या कोविड १९ कालावधीत संकटात सापडलेल्या नागरिकांकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करीत असल्याने नागरिकांमध्ये, विशेषत: महिलांमध्ये कमालीची अस्वस्था पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्‍यांनी त्वरित या विषयाकडे लक्ष द्यावे आणि गोरगरीबांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मार्च महिन्यापुर्वी म्हणजे कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावास टाळण्यासाठी संपुर्ण देशात संचारबंदी लावण्यात आल्याने देशात व राज्यात हातावर मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गोरगरीब महिलांनी व नागरीकांनी विविध वित्तीय संस्था व फायनान्स कंपन्याकडुन छोटेखानी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्प असे कर्ज घेतले आहे. कोरोना विषाणु संसर्गाच्या सहा महिन्यांच्या गोंधळात अनेक नागरीक बेरोजगार झाले असुन ते मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले असल्याने अशा परिस्थितीत कर्जाच्या परत फेडीस विलंब होत आहे. शासनाचे व रिजर्व बँकेचे सक्तीच्या वसुलीला विरोध दर्शविले असतांना देखील फायनान्स कंपन्याकडुन शासनाचे नियमांना न जुमानता कर्जवसुली साठी गुंडांचा वापर करून महीलांना दमबाजी व तुमचे सिव्हील खराब करू अशा प्रकारच्या धमक्या देवुन सक्तीची कर्ज वसुली करण्यात येत असल्याने आदीच कोरोनाच्या संकटात आर्थीक आधार संपलेले नागरीक फायनान्स कंपन्यांच्या या वसुलीच्या गोंधळाने चांगलेच त्रस्त झाले असून अनेकांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे . तरी जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारे  गोरगरिब जनतेने घेतलेल्या अल्प कर्जाच्यासक्तीची होणारी वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे .

 

Protected Content