पंतप्रधान मोदींनीच शेतकऱ्यांशी चर्चा करावी – कॉंग्रेस

चंडीगढ – आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांची बुधवारी येथे पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासही असमर्थ आहेत. त्यामुळे स्वत: मोदींनीच शेतकऱ्यांशी चर्चा करावी. चर्चेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा लॉलीपॉप तोमर यांनी दाखवला.

कृषी कायदे बनवण्याआधीच शेतकऱ्यांशी आणि राज्य सरकारांशी चर्चा करण्यासाठी समिती का स्थापन करण्यात आली नाही? छाननीसाठी कृषी विधेयके विशेष संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधकांनी संसदेत केली होती.

तसे का गेले नाही? भांडवलदार मित्रांच्या हितासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितांना बाधा पोहचवत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

 

Protected Content