रावेर पंचायत समितीत भ्रष्टाचार : आ. चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील ऐनपुर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर यांनी आपल्याकडे पंचायत समितीतीतील भ्रष्टाचाराचे पुरावे असून याची चौकशी करण्याची मागणी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर पंचायत समितीत भ्रष्ट्राचार वाढला असून पैसे घेतल्या शिवाय जनतेची कोणतीच कामे केली जात नाही.याचे माझ्याकडे पुरावे देखिल असल्याचा आरोप ऐनपुर ग्राम पंचायत सदस्य अनिल जैतकर यांनी केला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी याबाबतची तक्रार आ चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
रावेर पंचायत समिती सद्या जिल्हात चर्चेत आहे.कधी अनियमिता तर कधी भ्रष्ट्राचार तरी महापुरुषांचा अनादरामुळे काही दिवसांपूर्वी आलेल्या पंचायत राज समितीने सुध्दा नाराजी व्यक्त केली होती.आता ग्राम पंचायत सदस्याच्या पैसे घेतल्या शिवाय काम होत नसल्याच्या तक्रारीमुळे रावेर पंचायत समिती पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

तालुक्यातील वैयक्तिक शौचालयाची स्थिती

रावेर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन विभागाने वैयक्तिक शौचालये दिली जाते यासाठी प्रत्येक लाभार्थीला १२ हजार अनुदान दिले जाते. याच्या अंतर्गत २०१८/१९ मध्ये १५ कोटी २६ लाख ६४ हजार रूपयांचे अनुदान १२ हजार ७२२ लाभार्थीला दिले. २०१९/२० मध्ये ३ कोटी १४ लाख ४ हजाराचे अनुदान २ हजार ६१७ लाभार्थीला दिले. २०२०/२१ मध्ये २ कोटी १२ लाख ८८ हजार १ हजार ७७४ लाभार्थीना दिले. तर, २०२१/२२ मध्ये ५६ लाख ७६ हजार रुपये ४७३ लाभार्थांना दिले आहे.

१८ कोटी देऊनही हगणदारीची स्थिती जैसे-थे

रावेर पंचायत समितीने मागील चार वर्षात १८ कोटी २७ लाख ७२ हजार वैयक्तिक शौचालयाच्या नावाखाली १७ हजार ५८६ लाभार्थांना देण्यात आले आहे.यातील अनेक शौचालय निकृष्ट झाल्याने लाभार्थी वापर नसल्याचे लाईव्ह ट्रेंडस न्यूजने केलेल्या तपासामध्ये समोर आले आहे.तालुका हगणदारीमुक्त असल्याचे पंचायत समिती कडून सांगण्यात येत आहे.परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच दिसून येत आहे. यातच आता ग्रामपंचायत सदस्यानेच याबाबत तक्रार केली असून या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे.

Protected Content