Home Cities जळगाव जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत; जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली पुस्तक

जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत; जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली पुस्तक

0
295


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका महत्त्वाच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये दाखल झाले आहेत. शिरपूर येथून हेलिकॉप्टरने त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे जळगावमध्ये आगमन होताच, जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्यादरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन नाही, तर पुस्तक भेट देऊन स्वागत केले. हा स्वागत समारंभ अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound