फैजपूरमध्ये ‘स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅंलेज’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन

फैजपूर प्रतिनिधी | ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ‘ च्या अनुषंगाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात असताना आपल्या फैजपूरमध्ये ‘स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅंलेज’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, संस्था स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण सकल्पनांसह सहभागी होऊ शकतात. या आवाहनानुसार अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणा-या नव्या संकल्पनाची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनाचा प्रत्यक्ष उपयोग समाज व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट फैज़पूर नगरपरिषदने नजरेसमोर ठेवले आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पूनर्वापर, सामाजिक समावेश या संकल्पना असणे आवश्यक आहे.

दि. २४ ते ३१ डिसेंबर 2021 या कालावधीत स्पर्धमध्ये सहभागी होता येईल. स्पर्धत सर्वोत्तम तांत्रिक संकल्पना सादर करणा-या पहिला, दुसऱ्या व तिस-या क्रमांकास पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाची अभिनव यांत्रिक संकल्पना राज्यस्तरावरील फेरीसाठी पाठविण्यात येणार असून राज्यस्तरावरील स्पर्धकांतून सर्वोत्तम संकल्पना राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येणार आहेत . राष्ट्रीय स्तरावर अंतिम निवड झाल्यास केंद्र सरकारमार्फत प्रकल्प अंमलबजावणीसाठी २५ रक्कमेचे सीड फंडींग केले जाणार आहे. फैज़पूर नगरपरिषद स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकातून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या निवडक स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे . ‘स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅंलेज’चे सर्व अधिकार व निर्णय नगरपरिषदेने राखून ठेवले असून सहभागासाठी खालील ऑनलाईन गुगल फॉर्मची मध्ये माहिती भरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEuXTdRtpM5FeIOW49Jt-o8ZrFY7pg_Fy7BnKU8zC0AWT6CQ/viewform?usp=pp_url

त्यासोबतच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पाची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रकल्पातील पूरक छायाचित्रे, व्हिडिओ छायाचित्रीकरण, पीपीटी ( प्रत्येकी १ एमबी क्षमतेच्या जास्तीत जास्त ५ फाईल्स मर्यादा अर्जासहित अपलोड करावयाच्या आहेत.) अधिक माहितीसाठी शहर समन्वयक अश्विनी खैरनार (9579406909) याच्याशी संपर्क साधता येईल असे फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Protected Content