कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११ मध्येच समजलं होतं — जितेंद्र आव्हाड

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले,” असं विधान गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

 

राज्यात सध्या वाढत्या करोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडताना दिसत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं   त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यांच्या या  वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

 

कोरोनाच्या काळात  आपल्याकडे हे कब्रस्थान नसते, तर शहराची काय परिस्थिती झाली असती, याची कल्पनाही करवत नाही. याचा विचार अल्लाने आधीच २०११ मध्ये करून ठेवला होता की, २०२० मध्ये कोरोना येणार आहे. आणि हा कोरोना येण्यापूर्वी येथे कब्रस्थान बनले पाहिजे, म्हणूनच येथे कब्रस्थानासाठी २०११ मध्ये जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानाचे काम पूर्ण झाले,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Protected Content