नशिराबाद येथे राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

नशिराबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासकीय सेवेत असलेल्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजन लागू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद येथे लोकार्पणाच्या एका कार्यक्रमात दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास आघाडी सरकारने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, अशी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेने केली आहे. नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन वास्तूचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी संघटनेच्या वतीने दोन्ही मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा आरोग्य प्रतिनिधी सुनील ढाके, राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास कोळी, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस रविंद्र पवार, शेखर हिवरे, गणेश राजपूत, निलिमा येलगिरे, बफी साळुंखे, योगिता कोकाटे, मेघा चौधरी, वंदना दातार यांच्यासह आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content