रामदेववाडी शिवारातील शेतात तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी येथील शिवारातून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी  २४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप रघुनाथ बारी (वय-३३) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून  आपला उदरनिर्वाह करतो. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संदीप हा त्याची दुचाकी (एमएच १९ बीटी ५४१९) ने जळगाव तालुक्यातील रामदेववाडी शिवारातील शेतात आला. त्यावेळी शेताच्या बांधावर दुचाकी पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. संदीप बारी याने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे

Protected Content