बसस्थानक आवारातून शिक्षकाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील बस स्थानकाच्या आवारातून एका शिक्षकाची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शाहुनगरातील शिक्षक रविंद्र वसंत पाटील (वय-३७) यांनी बस स्थानकाच्या आवारात आपली दुचाकी (क्र. एम.एच. १९ ए व्हाय ६७२४) उभी केलेली असताना अज्ञाताने ती लंपास केल्याची धक्कादायक घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ८:४५ ते सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी पाटीलने परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली मात्र २५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा प्लस कंपनीची दुचाकी मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञाताने लंपास केल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून पाटीलने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दिपक पाटील हे करीत आहे.

Protected Content