भरधाव रिक्षाच्या धडकेत वयोवृद्ध जखमी

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भरधाव रिक्षाच्या जोरदार धडकेत वयोवृद्धा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भडगाव रोडवर उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे राहणाऱ्या वयोवृद्धा वाल्हाबाई धोंडू महाजन (वय-८४) ह्या भडगाव रोडवर असताना रिक्षा (क्र. एम.एच.१९ एई ६३१७) वरील चालकाने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात वाल्हाबाई धोंडू महाजन यांचा पाय फॅक्चर होऊन डाव्या हाताला, छाती व खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करण्याकामी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी सदर घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली असून अपघात घडताच चालक पसार झाला. याप्रकरणी वाल्हाबाई धोंडू महाजन यांच्या जाब जबाबावरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ अजय मालचे हे करीत आहे.

Protected Content