जामनेरात भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून गिरीश महाजन फाउंडेशन जामनेरच्या वतीने भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आले.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस भरती काढण्यात आले असून पोलीस भरती संदर्भातील भीती कमी करून त्यांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने भरतीपुर्व शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला सुमारे १ हजार ८०० हून अधिक पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थिती दिली. यावेळी उपस्थित उमेदवारांना ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि शुभेच्छा दिल्या. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकडून लेखी परीक्षा व ग्राउंड त्यामध्ये रनिंग, गोळा फेक प्रशिक्षण घेऊन त्यांची परीक्षा घेण्यात आली. भरती ग्रुप प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथम स्व. अटल बिहारी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, भुसावल उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शंकर मराठे, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक प्रा. शरद पाटील, अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड, सुहास पाटील, नवल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी केले. पोलीस प्रशिक्षण शिबिर पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस विभाग व गिरीश महाजन फाउंडेशनतर्फे परिश्रम घेण्यात आले.

 

Protected Content