कुऱ्हे पानाचे गावातून महिला बेपत्ता

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथून २४ वर्षीय महिला ही शौचालयाला जात असल्याचे सांगून १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून बेपत्ता झाल्या आहे. मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ तालुका पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मीना कमल डावर वय-२४, रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मीना डावर ही महिला आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे वास्तव्याला आहेत. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शौचालयाला जात असल्याचे सांगून महिला घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली.  त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content