विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची मुक्ताईनगर येथे धावती भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव येथून नागपूरकडे जात असताना जळगाव जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी मुक्ताईनगर येथे १८ डिसेंबर सोमवार रोजी भेट दिली असता त्यांचे विविध संघटनांकडून स्वागत करण्यात आले.

मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी महालक्ष्मी ऍग्रो चे संचालक बाळासाहेब सूर्यवंशी, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, मराठा समाज वस्तीगृह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, नगरसेवक संतोष मराठे, भास्कर पाटील, मनोज देवरे, अविनाश बोरसे, नरेंद्र भारंबे व ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते तथा गुजर समाजाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, जोगी समाजाचे जिल्हा संघटक तथा पत्रकार संदीप जोगी,  जयेश पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. सुपेकर यांनी आपण जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक असताना मुक्ताईनगरला अनेक वेळेस भेट दिली यादरम्यान मुक्ताईनगर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर व ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम व त्यांचे सहकाऱ्यांचे कार्य हे गौरवस्पद होते असे उद्गार या प्रसंगी काढले

Protected Content