ब्राऊन शुगर प्रकरणातील दोघांच्या कोठडीत वाढ

जळगाव प्रतिनिधी | ब्राऊन शुगर प्रकरणी अटकेत असणार्‍या दोन्ही आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.

गेल्या आठवढ्योत स्थानिक गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रावेर शहरातून, सुमारे एक कोटी रूपयांचे ब्राऊन शुगर जप्त केले होते. या प्रकरणी अख्तरी बानो अब्दुल रऊफ (रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला सुरूवातीला अटक केली होती. नंतर ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेरबहादूर खान (रा. किटीयानी कॉलनी, मंदसौर, मध्यप्रदेश) यालाही अटक केली. दोन्ही संशयितांना सुरूवातीला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जळगाव विशेष न्यायालयात न्यायाधीश एम.बी.बोहरा यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची कोठडी २७ पर्यंत वाढवली.

Protected Content