जुने जळगावात गुढीपाडवाच्या निमित्ताने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगावात न्यू अजिंक्य मित्र मंडळ व न्यू अजिंक्य महिला मंडळाच्या वतीने गुढीपाडवाच्या निमित्ताने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातील जुने जळगाव परिसरातील न्यू अजिंक्य मित्र मंडळ व न्यू अजिंक्य महिला मंडळाच्या वतीने गुढीपाडवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. या अनुषंगाने जुने जळगावात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जळगाव पिपल्य बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, नगरसेवक सुनिल खडके, नगरसेवक डॉ. विरण खडे, ललित चौधरी, मिलींद चौधरी, सुनिल भारंबे, हरीष कोल्हे यांच्यासह आदी उपस्थित होते.

रक्तदार शिबीर हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. तर १०० जणांचे रक्तगट तपासणी करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी जुने जळगावातील महिला, पुरूष व तरूणांनी परिश्रम घेतले.

Protected Content