Home Cities जळगाव ज्योती चव्हाण यांची महापौरपदासाठी मोर्चेबांधणी

ज्योती चव्हाण यांची महापौरपदासाठी मोर्चेबांधणी

0
165

जळगाव Jalgaon प्रतिनिधी । विद्यमान महापौरांची मुदत संपण्याच्या मार्गावर असतांना आता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. ज्योती चव्हाण यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची भेट घेऊन या पदावर आपल्याला संधी मिळावी अशी मागणी केल्याचे वृत्त आहे.

विद्यमान महापौर सौ. भारती सोनवणे jalgaon corporation mayor यांच्या पदाची मुदत १८ मार्च रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमिवर, नवीन महापौर निवडीच्या प्रक्रियेआधीच पडद्याआडच्या घडामोडी गतीमान झाल्या आहेत. आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला या पदासाठी असल्याने साहजीकच या पदासाठी स्पर्धा देखील वाढली आहे. यात आता सौ. ज्योती चव्हाण यांनी या पदावर आपल्याला संधी मिळावी अशी मागणी केली आहे.

या अनुषंगाने ज्योती चव्हाण यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची जामनेर येथे भेट घेतल्याचे वृत्त आहे. अर्थात, आता पुढील महापौरपद कुणाला मिळेल याबाबत स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound