अयोध्यानगरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयोध्या नगरातील रायसोनी शाळेसमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम रामदास ईश्वर (वय-२७) रा. अयोध्या नगर जळगाव हे व्यापर करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीडी ९१८३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोरील रायसोनी शाळेसमोर पार्क करून लावली होती. सायंकाळी ५ वाजता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला. दुचाकी कुठेही आढळून आली नसल्याने एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार ६ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदीवे करीत आहे.

Protected Content