Home क्राईम उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

0
43
two wheelar thift


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भाऊंचे उद्यानासमोरून एकाची १२ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, यश दिवानचंद वलभाणी रा. सीटी कॉलनी, चेतनदास मेहता हॉस्पीटल समोर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ते शहरातील भाऊंचे उद्यानासमोर दुचाकी (एमएच १९ बीपी ६६६०) ने आले होते. त्यावेळी उद्यानासमोर दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून लंपास केल्याचे उघड झाले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.


Protected Content

Play sound