जळगावात मुक्ताईनगर येथील पत्रकारावर हल्ला करणारे तिघे अटकेत; गावठी पिस्तूल, चॉपर हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । खोटे नगरातील राधिका हॉटेलसमोर कार थांबवून पत्रकारावर हल्ला करून लुटणाऱ्या टोळीचा तालका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चॉपर तसेच चाकू व लुटीतील रक्कम जप्त करण्‍यात आली आहे. तिघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, याबाबत सविस्तर वृत्त असे की वायरल न्यूज लाईव्हचे पत्रकार आतिक बिलाल खान (वय ४७, रा. मुक्ताईनगर) हे आपल्या मुलाचे इंजेक्शन आणण्यासाठी काल धुळे येथे गेले होते. धुळे येथून परतत असताना गुरूवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपाच्या मध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी नंबर एमएच १८डब्ल्यू ६८८५ ला मागून ओव्हरटेक करून प्रत्येकी डबलसीट असणारे दोन मोटर सायकल स्वार यांनी त्यांची कार थांबवली. यांनतर या चार लोकांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी तोंडावर, छातीवर मारा करत त्यांच्या खिशातील ६०० रुपये रोख व एक पेन हिसकावून घेत पळून गेले.

या संदर्भात आतीक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड व पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी फिर्याद घेऊन कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सीसीटिएनएस प्रणालीने शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी तपासचक्र फिरविण्‍यास सुरूवात केली. तेवढ्यात रोहन उर्फ रॉनी मधूकर सपकाळे (रा.दांडेकर नगर, पिंप्राळा) याचा लुटीत समावेश असून तो खोटेनगरजवळ एमएच.१९.क्यू.०९९० क्रमांकाच्या वाहनात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. क्षणाचा विलंब न करता पोलिसांनी खोटेनगर स्टॉप गाठले आणि रोहन याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील वाहनाची तपासणी केली असता, त्यात गावठी पिस्तूल, चॉपर, चाकू व लुटीतील सहाशे रूपये पोलिसांना मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, रोहन यांची कसून चौकशी केल्यानंतर या लुटीत अनिकेत मधूकर सपकाळे (रा.दांडेकर नगर) व सतिष रवींद्र चव्हाण (रा. ओमशांतीनगर) यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी लागलीच या दोघांना सुध्दा अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ चार तासात संशयितांना पकडण्‍यात पोलिसांना यश आले आहे.

तालुका पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार, सतिष हाळणोर, वासूदेव मराठे, विजय दुसाने, ललित पाटील, प्रवीण हिवराळे, सुशील पाटील, अनिल मोरे, दीपक कोळी, दीपक राव आदींनी ही कारवाई केली आहे.

Protected Content