हॉटेलसमोरून मजूराची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौकातील हॉटेल महिंद्रा समोरून मजूराची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल सुभाष लोखंडे (वय-३३) रा. इंदिरानगर, कुसुंबा ता.जि.जळगाव ह.मु. अजिंठा हौसिंग सोसायटी जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील हॉटेल महिंद्रा समोर त्याने त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीए ३१००) पार्किंग करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकी चोरी झाल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Protected Content