बँकेच्या खात्यातून ३ लाख २० हजार परस्पर वर्ग; बँक व्यवस्थापकासह एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिपल्स कोऑपरेटीव्ह बँकेत असलेल्या जॉईट खात्यातून जोडीदाराने बँक व्यवस्थापकाच्या मदतीने परस्पर ३ लाख २० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापकासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सुनिल मानकचंद कोटेचा (वय-५६) रा. सुमन रेसीडन्सी, गणपती नगर जळगाव आणि दिलीप विजय कोटेजा रा. मेहरूण जळगाव यांनी दोघांनी भागीदारीतून महाविर सिव्हील एजन्सी नावाने पोलन पेठ येथील जळगाव पिपल्स को-ऑप बँकेच्या मुख्य शाखेत जॉईंट खाते आहे.  दरम्यान दिलीप कोटेजा यांनी भागीदार असलेले सुनिल कोटेजा यांची कोणतीही पुर्व कल्पना न देता परस्पर खात्यातून ३ लाख २० हजार रूपये २३ मार्च २०२० रोजी स्वत:च्या खात्यात वर्ग करून घेतले. दरम्यान पैश्यांच्या हिशोबात मोठ्या प्रमाणावर फरक पडल्याने सुनिल कोटेजा यांना शंका आली. त्यांनी गेल्या दोन वर्षाची बँक स्टेटमेंट चेक केले असता त्यांना हा प्रकार मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी लक्षात आला. व्यवसायात भागीदार असलेले दिलीप विजय कोटेजा आणि पिपल्स बँक व्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी संगनमताने जॉईंट खात्यातून ३ लाख २० हजार रूपये दिलीप कोटेजा यांनी फसवणूक केली. यासंदर्भात मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता विजय कोटेजा आणि बँक व्यवस्थापक मिलींद जोशी यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे. 

 

Protected Content