कानळदा येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती विनोदी पथनाट्य

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथे जागतिक एड्स दिनानिमित्त दिशा बहुउद्देशिय संस्था आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने जनजागृती विनोदी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

विनोदी पथनाट्याद्वारे उपस्थित ग्रामस्थांना एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच माहितीपर विविध पॉम्लेट व पुस्तिका गावकऱ्यांना वितरीत करण्यात आली तसेच कोरोना आणि एड्स विषयी पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. यावेळी जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना एड्स प्रतिबंधक व नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध सुविधा केंद्राची माहिती तसेच त्यामध्ये एचआयव्ही आजाराचा संसर्ग कसा होता, एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सर्व व्यक्तिंना मोफत औषधोपचार व तपासणी याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी दिशा पथनाट्याचे प्रमुख दिनोद ढगे, सचिन महाजन, आकाश धनगर, दुर्गेश अंबेकर, माहिती पाटील, अवधूत दलाल यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/662063471138107/

Protected Content