भगवान परशुराम जयंती निमित्त विविध कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बहुभाषीक ब्राह्मण महासंघातर्फे यंदा देखील भगवान परशुराम जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बहुभाषीत ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदादेखील भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ मे रोजी भव्य दुचाकी रॅली तर ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील रथ चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विविध भाषा बोलणारे तसेच विविध शाखांमधील ब्राह्मण बांधव सहभागी होणार आहेत.

१ मे रेाजी संध्याकाळी ५ वाजता संभाजी चौकापासून दुचाकी रॅलीची सुरवात होईल. बालगंधर्व खुले नाट्यगृह या ठिकाणी समारोप होईल. यानंतर, ३ मे रोजी रथचौक राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून बालगंधर्व नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप होईल. दरम्यान, भगवान परशुराज जयंती उत्सवासाठी विविध कार्य समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात ४०० स्वयंसेवकांचा समावेश आहे. तर शोभायात्रेत सहभागी होणार्‍या ढोल पथकाचा सराव शिवतीर्थ मैदानावर सुरू आहे.

भगवान परशुराम जयंती उत्सवासाठी बहुभाषीक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अजित नांदेडकर, महिला अध्यक्षा मनिषा दायमा, नियोजन समिती प्रमुख श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, सुधा खटोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

Protected Content