दुचाकीचा धक्का लागल्याने एकाला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण मधील मास्टर कॉलनी येथील ४४ वर्षीय व्यक्तीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून रंगपंचमी खेळणारे १० ते १२ मुलांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडिसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासीम अब्दुल रहिम खाटीक ( वय-४४) रा.मास्टर कॉलनी मदरसा जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरूण येथील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून दुचाकीने जात असताना त्याठिकाणी एकाला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून रंगपंचमी खेळणारे १० ते १२अनोळखी मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत कासीम अब्दुल रहीम खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

 

Protected Content