घंटागाडीमध्ये खाद्यपदार्थांची स्वतंत्र व्यवस्था करा, रिद्धी जान्हवी फाऊंडेशनचे आयुक्तांना निवेदन

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या घंटागाडी मध्ये गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याबरोबर खाण्याचे पदार्थ स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करा याबाबतचे निवेदन सौ. चित्रलेखा मालपाणी रिद्धी जान्हवी फाउंडेशन ने महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिले.

निवेदनात असे म्हटले आहे की, जळगाव महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या घंटागाडी मध्ये ओला कचरा व सुका कचरा असे दोन प्रकारची व्यवस्था तयार केली गेलेली असून त्यात नागरिकांकडून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात आहे, तरी या कचरा व्यतिरिक्त नागरिकांकडून या घंटा गाडीमध्ये खाण्याचे पदार्थ पोळ्या व अन्न अशा प्रकारचे खाद्यपदार्थ गाडीतच टाकले जातात त्या पदार्थांचा वापर गायी व गुरांसाठी होऊ शकतो आपल्या महानगरपालिकेकडून घंटागाडीमध्ये एक बकेट अजून स्वतंत्र लावली गेली तर हे पाहून लोक जे अन्न व पोळ्या रस्त्यावर फेकून देतात तर ते रस्त्यावर अन्नाची नासाडी होणार नाही व ते अन्न बकेटमध्ये टाकतील व ते जमा झालेले अन्न आहे व गोशाळा येथे पाठवून त्याचा चांगल्या अन्नाचा गुरांसाठी खाद्य म्हणून वापर होईल व अन्नाची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली जाईल.

तरी आपण या निवेदनाचा विचार करून घंटागाडी मध्ये बदल करून अन्नाची नासाडी थांबून अन्नाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्यात यावी. आमचे फाउंडेशन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार असून आपण परवानगी दिल्यास आम्ही या उपक्रमाचा प्रचार करून हा उपक्रम यशस्वी करून दाखवू हा उपक्रम आपल्या महापालिकेतर्फे देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात पहिला उपक्रम असेल त्यासाठी आपण या उपक्रमाला प्रशिक्षण उपक्रम यशस्वी करण्यात येईल.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.