कोविडचे रूग्ण शंभरीच्या आत; ८० जण पॉझिटीव्ह; २५२ कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असून आज शंभरच्या आत म्हणजे ८० जण कोरोना बाधीत आढळून आले असून २५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा ओसरणीला लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रूग्ण संख्येत घट होत आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ८० कोरोना बाधीत आढळून आले असून २५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये एक रूग्णाचा मृत्यू झालेला आहे.

 

जिल्ह्यातील तालुक्यानुसार विचार केला असता; धरणगाव व मुक्ताईनगरात गत चोवीस तासांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर उर्वरित तालुक्यांमध्ये जळगाव शहर-५; जळगाव ग्रामीण-१०; भुसावळ-६; अमळनेर-४; चोपडा-३; पाचोरा-७; भडगाव-४; यावल-१; एरंडोल-२; जामनेर-३; रावेर-२; पारोळा-६;  चाळीसगाव-२४; बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे रूग्ण आढळून आले आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.