दिशा रवीला राहूल व प्रियंकांचे समर्थन

नवी दिल्ली । टुल किट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवी यांच्या समर्थनासाठी आता राहूल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका पुढे सरसावल्या आहेत.

‘डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से’ ही एका प्रसिद्ध गाण्याची ओळ शेअर करत प्रियांका गांधीनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. एका निशस्र मुलीला हे बंदुकधारी लोक घाबरत आहेत, निशस्त्र मुलीमुळे सामान्यांची हिंमत वाढत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

दिशा रवीला अटक केल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत गळचेपी केला जात असल्याचं आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काही घटनांच्या बातम्या ट्विट केल्या आहे. यात ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे.

या तीन बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेतील ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर “ते (मोदी सरकार) घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही,” असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

Protected Content