अमृता फडणविसांचे नवे गाणे चर्चेत

मुंबई प्रतिनिधी । अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन्स डे च्या पार्श्‍वभूमिवर आपले नवीन गाणे सादर केले असून ते सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहे. यावरून अनेक युजर्सनी अतिशय खवचट कॉमेंटस् केल्या असून काहीहनी समर्थन सुध्दा केले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी गायली आहेत. सामाजिक विषयांवरील त्यांची अनेक गाणी आहेत. यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला निमित्ताने अमृता यांनी खास गाणे सादर केले आहे.

‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे बोल आहेत. एका समुद्र किनाऱ्यावर हे गाणे त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. लाल रंगाच्या वनपीसमध्ये त्यांनी हे गाणं शूट केलं आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत. तर त्यांच्या टीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यू-ट्यूबवर त्यांच्या गाण्याला ट्रोल करत नेटकऱ्यांकडून कमेंट्स दिले जात आहेत. 

यावरून अनेक युजर्सनी अतिशय खवचट कॉमेंटस् केल्या असून काहीहनी समर्थन सुध्दा केले आहे.

Protected Content